एका आश्रमशाळेचा प्रवास

कल्याण आश्रमाच्या कामात १५ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती घडली. माझे नशीब खूपच चांगले म्हणून मला या दोन्ही उपक्रमांचा एक भाग होण्याचे भाग्य लाभले. १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उतेखोल-माणगाव इथे कातकरी मुलांसाठी आश्रम सुरु झाला. अधिक वाचा...

भुलेश्वर मंदिर, माळशिरस

पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले भुलेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलत: हे ठिकाण 'मंगलगड' असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. अधिक वाचा...

संत चोखामेळा

संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ . उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. अधिक वाचा...

डॉ. केशव बळीराम हेडगेवार
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा, एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सीमेच्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावात झाला. हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली चिकित्सा शिक्षण घेण्यासाठी ते कोलकत्त्याला गेले. अधिक वाचा...

शिक्रा

कबुतराच्या आकाराची छोटी घार म्हणजे शिक्रा पक्षी. वरील बाजूने राखट निळसर तर खालील बाजूस पांढरा आणि त्यावर तपकिरी पट्टे आणि शेपटीवर रुंद काळपट रेघांमुळे ओळखता येतो. मादीचा आकार हा नरा पेक्षा मोठा असतो आणि तिच्या वरील बाजूस तपकिरी रंग बघायला मिळतो. अधिक वाचा...

कबड्डी

कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातला मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. अधिक वाचा...

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF