MarathiWorld - HomeMuktangan
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठीवर्ल्ड > मुक्तांगण - कविता मुख्य पान



मराठीवर्ल्डच्या मराठी रसिकांनी पाठवलेल्या 'कविता'


माहेराचे गाव माझे

माहेराचे गाव माझे
पहाटेला उजाडले
वाटते की उषेसंगे
सप्तरंगी ओलावले

माहेराचे गाव माझे
उन्हामध्ये उजळले
वाटते की अरूणाचे
तेज त्याने पांघरले

माहेराचे गाव माझे
सांयकाळी सुने झाले
वाटते की शांततेच्या
अंकावरी विसावले

माहेराचे गाव माझे
अंधारात अंधुकले
वाटते की चांदण्याच्या
प्रांगणात सुखावले

सौ. शर्मिला उपेंद्र कुलकर्णी,
पुणे.





 

 


 

 

 

 

 

 

   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.