ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि नैमिषारण्य

naimisharannya ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र, कार्य आणि त्यांना प्रिय असलेल्या नैमिषारण्याविषयी दुर्मिळ माहिती या पुस्तकात संग्रहित केली आहे. यातील नैमिषारण्य महात्म्य तर अवर्णनीय असून या पुस्तकाच्या रुपाने वाचकांना ही आनंदाची मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. नैमिषारण्याचे हिंदू धर्मात वेदांमध्ये मोठे स्थान आहे.

संपादक – श्री. सुहास विठ्ठल समुद्र
जन्मतारीख – २७ जून १९५५
जन्म स्थळ – नाशिक
मूळगाव – डिंगोरे, ता. जुन्नर, जिल्हा – पुणे
नोकरी – सेंट्रल बँकेतून स्वेच्छानिवृत्ती.

शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण संघ – बदलापूर
अध्यक्ष पद ११ वर्षे

याज्ञवल्क्य आश्रम, १२१ कसबापेठ पुणे
संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त
याज्ञवल्क्य भूषण पुरस्कार प्राप्त (२००२)
संगोपिता – अपंग आणि मतिमंद पुनर्वसन केंद्र
बदलापूर, कार्यकारिणी सदस्य

कालीपीठ संस्थान, नैमिषारण्य संरक्षक सदस्य
गेली १६ वर्षे वैष्णवदेवी यात्रा व सप्तशती पाठ
गाणगापूर संगमावर गुरूचरित्र पारायण.
नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी असे अनेक यज्ञयाग स्वगृही संपन्न.
अनेक साधुसंत सत्पुरूष, शंकराचार्य यांचे स्वगृही आगमन व पूजन.
१९७६ साली विवाह. पत्नी – सौ सुनिता सुहास समुद्र.
गृहकृत्यदक्ष – कुटुंबवत्सल धर्म परायण.
पुत्र – श्रीराम, कन्या – भक्ती, दोघेही विवाहित, सुस्थितीत.

१९७५ पासून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी लीन, गोंदवल्याच्या अगणित वाऱ्याकरून महाराजांचे तत्वज्ञान आणि उपदेश आत्मसात करण्यात.

पुस्तकब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि नैमिषारण्य
किंमत – रु. ४० रुपये

‘रामभक्ति व आत्मबोध’ (Devotion & Self Realisation)

ramabhakti राममंदिर मनात उभे करणे आणि सुरक्षित ठेवणे अधिक अवघड व सत्वपरीक्षा पाहणारे आहे. कारण ते संस्कारक्षम जीवनशैलीचे आहे. पायाभरणी पासून उच्च शिखरापर्यत, संस्कृती, शिकवण, आचार विचार, आहार विहार, यांच्या माध्यमातून त्याची बांधणी होणार आहे. मंदिराची उभारणी करून श्रीरामाची स्थापना करणे आणि नित्य पूजा-अर्चा करणे हे प्रत्येकाचे जीवन कर्तव्य असून ते प्रत्येकाच्या हातात आहे.

आपल्या मनात राममंदिर उभे करून रामभक्तिची सुरवात करण्यासाठी ‘रामभक्ति व आत्मबोध’ (Devotion & Self Realisation) हे कै. चंद्रकांत गणेश भुरके यांचे पुस्तक आपल्यासमोर येत आहे. जगात आपण कुठून आलो आणि आपणास अंतीम कोठे जावयाचे आहे याचे ज्ञान होण्यासाठी भक्तिचा मार्ग अवलंबून आत्मबोध करण्यात हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रेरणेनी लिहिलेल्या या पुस्तकाची प्रथम आवृत्ती १९८४ साली ‘मनाचे नवे श्लोक’ या नांवाने रचनाकारानी स्वत: प्रकाशित करून, त्यातील विचारांचा प्रचार होण्यासाठी त्याचे विनामूल्य वितरण केले. पुढे समर्थांच्या आशिर्वादानी रचनाकाराकडून आणखी नवे श्लोक लिहिले गेले व त्याचे त्यांनी इंग्रजीत भाषांतरही केले. एकूण ३५० मराठी श्लोक व त्यांचे इंग्रजी भाषांतर असलेली, सुधारित द्वितीय आवृत्ती ‘रामभक्ति व आत्मबोध’ (Devotion & Self Realisation) या नांवाने पुन्हा प्रकाशित होत आहे.

समस्त सृष्टिची शक्ति म्हणजे परमेश्वर. त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी ज्या सोपानावरून जावे लागते त्यापैकी एक मार्ग मन-प्रबोधनाचा आहे आणि भक्ति हे त्याचे एक साधन आहे. स्वत:च्या मनावर सदविचारांचे प्रक्षेपण करून मनाला केलेल्या उपदेशातून व भक्तिच्या माध्यमातून जीवनसाध्य कसे साधता येईल हे रचनाकारानी या श्लोकांद्वारे सांगितले आहे. प्राचीन काळापासून सध्याच्या विज्ञान युगातही त्याचा वापर करणे गरजेचे आहे. हे कार्य या श्लोकांद्वारे करण्यात आले आहे. हे श्लोक समर्थांच्या प्रेरणेनी लिहिले असल्यामुळे त्यावर समर्थाच्या मनाच्या श्लोकांची छाप पडलेली दिसते.

सामान्यांना समजेल, उमजेल आणि आचरणात आणता येईल एवढया सोप्या पध्दतीने श्लोक रचना केली आहे. पहिल्याच श्लोकात रचनाकार मनुष्य जन्माचे कारण, त्याची सार्थकता, जीवनतत्व व ते जाणण्यासाठी प्रयत्न कर असे मनाला सांगत आहे.

‘मना जन्म येई प्रभुच्या कृपेनी, तया सार्थकी लाव त्याच्या जपाने।
मना तत्व हे ठायी तुझ्या वसावे, तया अंतरी नित्य तूही पहावे।’
भक्तिमार्गावरून वाटचाल करताना जीवनातील अनेक तत्त्वे रचनाकारानी अगदी मोजक्या शब्दांतून सांगितली आहेत.
‘जया ज्ञान नाही तया मान नाही ।
जया बुध्दि नाही तया सिध्दी नाही ।
जया युक्ति नाही तया शक्ति नाही ।
जया भक्ति नाही तया मुक्ति नाही ।’

हे पुस्तक म्हणजे मनुष्याच्या जीवनाचे प्रतिबिंब असल्यामुळे भक्तिचा मार्ग अवलंबताना धर्म, ध्येय, ध्यान, धैर्य, इ. चे महत्व मनाला उद्देशून, समजावून सांगून अखेर रचनाकाराने अविरत भक्तिचे फल परमेश्वराशी सारूप्य सांगितले आहे आणि ते जाणणे, समजणे आणि उमजणे हीच मुक्ति होय.

या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे यातील मराठी श्लोकांचे इंग्रजी भाषांतर केले असल्यामुळे अमराठी भाषिकांनाही हे पुस्तक वाचता येईल. रचनाकाराचे इंग्रजीवर ‘प्रभुत्व’ असल्यामुळे श्लोकांचे भाषांतर समर्पक अचूक व अर्थपूर्ण झाले आहे.

रामभक्तांच्या संग्रही व नित्य वाचनात हे पुस्तक असावे. हे पुस्तक श्रीमती हेमलता चद्रकांत भुरके, सातारा यांनी प्रकाशित केले आहे. श्रीरामाचे चित्र असलेले रंगीत मुखपृष्ठ व उत्कृष्ट छपाई, मांडणी व बांधणी श्री काम्प्युटर्स, सातारा यांनी केली आहे.

पुस्तकरामभक्ति व आत्मबोध
लेखिका – हेमलता चद्रकांत भुरके
प्रकशक – श्री काम्प्युटर्स, सातारा