नारळी भात

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - २ भांडी जुने आंबेमोहर तांदूळ, ३ भांडी पिवळाधमक चिरलेला गूळ, २-३ लंवगा, ५-६ वेलदोडयांची पूड, ४ टेबलस्पून साजूक तूप, १ नारळ खवून

कृती - भात करण्यापूर्वी तांदूळ निवडून स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. खवलेला नारळ व गूळ मिसळून घ्यावा व भातात घालावा. पातेल्यात बुडाला १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात लवंगा परतून घ्याव्यात नंतर त्यात भात गूळ व नारळ घालावे व पातेल्याखाली तवा ठेवून मंद आचेवर अधूनमधून हलक्या हाताने ढवळून २-३ वाफा द्याव्यात. नंतर वेलदोडा पूड व १ चमचा तूप सोडावे व झाकण ठेवून गॅस बेद करावा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा