जन-गण-मन

आपल्या देशाचे राष्ट्रगीत (National Anthem) जन-गण-मन हे नोबेल पारितोषिक विजेता रविंद्रनाथ टागोरांनी मूळ बंगालीत लिहिले होतो. कलकत्ता येथे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अदिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी प्रथम म्हटले गेले. देशभरांत म्ह्टले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे. ह्या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. राष्ट्रगीत गाण्याचे काही नियम आहेत. राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय ५२ सेकंदात म्हणायचे असते. गीत म्हणतांना स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करुनच हे गीत म्हणावे. आपल्या ह्या राष्ट्रगीता बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी –

www.indianchild.com/national_anthem.htm,
www.national-anthems.net/IN,
www.theholidayspot.com/indian_independence_day/anthem.htm,
en.wikipedia.org/wiki/Jana_Gana_Mana,
www.iloveindia.com/national-symbols/national-songs.html,
www.tourindia.com/insignia/anthem.htm, india.gov.in/knowindia/national_anthem.php,
www.despardes.com/indian_anthem.html, india.suramya.com/india_anthem.php

वन्दे मातरम्
वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गाणे (National Song) आहे. बंकीमचंद्र चटोपाध्याय ह्यांनी संस्कृत आणि बंगालीचा ह्या दोन्ही भाषांचा ह्या गाण्यात वापर केला आहे. १८८२ साली हे गीत त्यांनी आनंदमठ पुस्तकात प्रथम लिहीले. अवघड शब्दरचना, ब्रिटीश राज्याचा विरोध आणि भारतमातेचे गौरव गीत म्हणून ब्रिटीशांनी ह्या पुस्तकावर बहिष्कार घातला. बंकीमचंद्रच एकदा म्हणाले होते, “मी असेन-नसेन पण हे गीत लोकप्रिय होणार हे नक्की”. आजही ऑल इंडिया रेडिओवर सकाळीची प्रसन्न सुरुवात वन्दे मातरम् नेच होते. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Vande_Mataram, www.indianchild.com/vande_mataram.htm,
www.freeindia.org/vmataram/vande_mataram_composed.shtml,
www.freeindia.org/vmataram/, ww.smashits.com/music/pop/songs/860/vande-matram.html,
www.freeindia.org/vmataram/, www.iloveindia.com/national-symbols/national-songs.html

विजयी विश्व तिरंगा हमारा
“झेंडा उंचा रहे हमारा” असे म्हणत स्वातंत्रदिनी आपण तिरंगा झेंड्याला वंदन करणार आहोत. तिरंगा म्हणजे तीन रंगात – भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगात असणारा आणि मध्य भागी अशोक चक्र असणारा हा ध्वज २२ जूलै १९४७ रोजी एकमताने भारताचा हा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित करण्यात आला.

तिरंग्याचे कापड हे खादीचे असते. त्याचे रंग व माप नियमांनुसारच वापरली गेली पाहिजेत. तिरंग्याचे डिझाईन व संकल्पना पिंगळी वेंक्कया ह्यांची आहे. परंतू दुर्दैवाने त्यांच्या विषयी आजही लोकांना माहिती नाही. पिंगळी वेंक्कया आणि तिरंग्या विषयी अधिक वाचा –
http://en.wikipedia.org/wiki/Pingali_Venkayya, http://en.wikipedia.org/wiki/Flag_of_India,
www.tiranga.net, www.search4i.com/13338/Directory/Tiranga.aspx,
www.indianchild.com/flag_of_india.htm, www.flagfoundationofindia.in/tiranga-exhibition.html,
www.yuvahindustani.com/tiranga-exhibition.html, www.liveindia.com/tiranga

जय हिंद जय भारत
स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती देणा-या वीरांना प्रणाम. शाळा, विद्यालये, सरकारी कचे-यां मधून झेंडा वंदन केले जाते. पण बाकीच्यांचे काय ? त्यांच्यासाठी केवळ एक सुट्टीचा म्हणून हा दिवस साजरा होईल. परदेशात अनिवासी भारतीय बरेच वेळा स्वातंत्र दिन ‘वीकएंड’ ला साजरा करतात. औपचारिकता किंवा ‘सेलिब्रेशन’ म्हणून हा दिवस संपून दुसरा दिवस नेहमी प्रमाणे सुरु होतो. रस्त्यांवर दुस-या दिवशी झेंडयांचे ढीग पडलेले दिसतात. प्रत्येकाने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नेटवरही ह्या संदर्भात विविध माहिती वाचायला मिळते –
www.presidentofindia.nic.in/scripts/independenceday.jsp,
www.dgreetings.com/independence_day_cards/indian,
festivals.tajonline.com/independence-day.php en.wikipedia.org/wiki/Independence_of_India,
www.123independenceday.com/indian/independence/day,
www.123independenceday.com/, www.indianchild.com/indian_independence_day.htm,
festivals.iloveindia.com/independence-day/index.html

– सौ. भाग्यश्री केंगे