लसूण

कांद्याचा जोडीदार लसूण सर्व जगभरात खाल्ला जातो. त्यामध्ये ‘क्रो’, ‘फिल्ड’, ‘एलिफंट’ अश्या अनेक जाती आहेत. लसणाच्या पाकळ्यांबरोबरच त्याची पात सुध्दा आवडीने खाल्ली जाते. फार पूर्वी ब्रिटीश जेवणात लसूण क्वचित वापरला जायचा परंतु युरोप, स्पेन, इजिप्त, भारतांमध्ये ह्याचा वापर अत्यंत पुराणकाळापासून औषधे आणि खाण्यासाठी केला जातो. अधिक माहितीसाठी – en.wikipedia.org/wiki/Garlic, www.garlic-central.com/garlic-health.html,
www.ayurvediccure.com/garlic.htm,
www.garlic-central.com/garlic-health.html,
www.nutrasanus.com/garlic.html, www.innerself.com/Health/garlic.htm,
www.healingdaily.com/detoxification-diet/garlic.htm,
www.alternativemedicineviews.blogspot.com

कांदापात

कांदापात किंवा स्प्रिंग ओनियन भारतात भाजी बरोबर इतर देशातही सूप्स, सॅलड, नूडल्स, सीफूडस मध्ये वापरला जातो. वेगवेगळ्या देशात कांदापातीची नावे नाविन्यपूर्ण आणि मजेशीर आहेत. अमेरिका आणि कॅनडात स्कॅलियन आणि ग्रीन ओनियन, ऑस्ट्रेलियात शॅलटस, फिलीपाईन्स मध्ये लासूणा, वेल्समध्ये गिब्ब्नस, इटॅलीत चिप्पोलोट्टी, कोरियात पा, जपानमध्ये नेगी, टर्की मध्ये ताजे शोगान. ह्या देशांमधल्या पाककृतीही विविध आहेत. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Scallion, www.the-gardeners-calendar.co.uk/plant_database/plants.asp?p=2, www.tarladalal.com/ViewContributedRecipe.asp?recipeid=7482, www.flickr.com/photos/davidsoco/90295888/in/set-72057594052871982/, www.grouprecipes.com/s/spring-onion/recipe/1/relevancy,
www.angelfire.com/country/fauziaspakistan/potato-springonionbhaji.html,
www.greek-recipe.com/static/ingredients/spring_onion.html, ruchii.wordpress.com/2006/10/09/spring-onion-curry/,
www.simcooks.com/171/spring-onion-chicken/,
www.bharatwaves.com/Spring-Onion-and-Potato-Soup-319-recipe.html, www.recipezaar.com/276470

दुधी भोपळा

फिक्कट हिरवा आणि मऊ सालीचा दुधी भोपळा खरं तर फळ आहे. परंतु त्याचा वापर भाजी म्हणून होतो. फार पूर्वीपासून दुधी भोपळा पिकवला जायचा पण खाण्यासाठी नव्हे तर त्याच्या बाटली सारख्या आकारात वस्तू साठविण्यासाठी. कालांतराने दुधीचा खाण्यासाठी आणि औषधासाठी चीन आणि भारतात वापर होऊ लागला. दुधी भोपळ्याचा वापर जपानचा प्रसिध्द पदार्थ सुशी मध्येही करता येतो. मेक्सिको आणि अफ्रिकेत दुधी भोपळा पाणी नेण्यासाठी किंवा साठवणीसाठी अजूनही वापरला जातो. देशीविदेशी पाककृती आणि अधिक माहितीसाठी – en.wikipedia.org/wiki/Calabash,
www.kitazawaseed.com/seeds_bottle_gourd.html,
www.britannica.com/eb/article-9015875/bottle-gourd, food.sulekha.com/recipes/post/2008/01/bottle-gourd-halwa.htm, www.nandyala.org/mahanandi/archives/2006/01/02/bottle-gourd-curry-soraka…, www.indiacurry.com/vegcurry/v007laukikofta.htm, www.mamtaskitchen.com/recipe_display.php?id=10224,
www.pachakam.com/recipe.asp?id=258

लाल भोपळा

पोषणमूल्ये असणारा लाल भोपळा भारता इतकाच अमेरिकेही लोकप्रिय आहे इतका की तेथे थंडीच्या दिवसात ‘हॅलोविन’ नावाचा उत्सव साजरा करतात. ‘थॅक्स गिव्हींगलाही’ भोपळयाचा पाय (pie) किंवा केक करुन वाटला जातो. कॅनडातही ‘पंकीन फेस्टीवल’ साजरा केला जातो. कोरीया आणि जपान मध्ये कुरुप स्त्रीला ‘पंकीन’ म्हटले जाते. जगातला सर्वात मोठा भोपळा ७०० किलो वजनाचा होता. भोपळ्याच्या विविध पदार्थांबरोबरच त्याच्या बियाही पौष्टीक आहेत त्यामुळे त्यांचा वापरही आहारात व्हायला हवा. देशीविदेशी पाककृती आणि अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Pumpkin, www.webindia123.com/garden/vegie/pumkin.htm, pumpkinnook.com/, www.pumpkin-patch.com,
www.pumpkinnook.com/cookbook.htm,
www.pumpkin-patch.com/recipes.html,
www.bbc.co.uk/food/recipes/mostof_pumpkins.shtml, www.whereincity.com/recipes/tamilnadu/sweet-pumpkin-curry-2772.htm, blogs.ibibo.com/nvijrnu2/pumpkin-time–favortie-recipes.html,
www.discussionabout.com/curried-pumpkin-soup-t2754.html, www.whereincity.com/recipes/tamilnadu/sweet-pumpkin-curry-2772.htm

कोबी

कोबी किंबा पत्ता कोबी हा पुरातन काळापासून ग्रीक आणि रोमन लोकांना माहिती होता त्यांच्या म्हण्यानुसार कोबी हे पृथ्वीवरची खाल्ली जाणारी सर्वात पहिली भाजी आहे. व्हीटॅमीन सी चा प्रमुख स्त्रोत असणारा कोबी भारताबरोबर इतर देशात विविध पदार्थात वापरला जातो. युरोप मध्ये भरलेला कोबी पकवान्न आहे तर जर्मनी आणि कोरीयात कोबीचे लोणचे लोकप्रिय आहे. युरोप मध्ये कोबीचा औषधी वापर केला जातो. हिरव्या पांढरया रंगाबरोबरच लाल रंगाचा कोबीही इतर देशात वापरला जातो. देशीविदेशी पाककृती आणि अधिक माहितीसाठी-
en.wikipedia.org/wiki/Cabbage, whfoods.org/genpage.php?tname=foodspice&dbid=19, www.indobase.com/recipes/category/cabbage-50.php, www.webindia123.com/cookery/curry/veg/cabbage.htm,
www.aboutcabbagesoupdiet.com,
www.cabbage-soup-diet.com,
www.indobase.com/recipes/category/cabbage-50.php,
www.mom-mom.com/cabbage.htm, www.indianrelish.com/cabbage

फ्लॉवर

कोबीच्या परिवारातला सदस्य फ्लॉवरचे उत्पादन सर्वाधिक चीन मध्ये होते तर १/४ भारतात होते. फ्लॉवर किंवा फुलकोबीत ७७% व्हीटॅमीन सी असून इतरही महत्त्वाची खनीजे आहेत. भारतात बहुतेकवेळा पांढरा फ्लॉवर वापरा जातो परंतु कॅनडात उगवणारा नारिंगी रंगात असणारया फ्लॉवरमध्ये व्हीटॅमीन ए नेहमीच्या फ्लॉवरपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे. नारिंगी बरोबरच इटलीत जांभळ्या आणि हिरव्या (ब्रोकोली) रंगातही फ्लॉवर खाल्ला जातो. खरंतर फ्लॉवरची पानेही अत्यंत पौष्टीक असतात परंतु बहुतेक वेळा ती पाने टाकून दिली जातात. देशीविदेशी पाककृती आणि अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Cauliflower,
www.ficciagroindia.com/production-guidelines/vegetables/cauliflower/cauliflower.htm, www.kissankerala.net/kissan/kissancontents/cauli.htm, www.spiderkerala.com/kerala/recipes/ViewRecipe.aspx?RecipeId=5, food.sify.com/special/cauliflower/, www.spiderkerala.com/kerala/recipes/ViewRecipe.aspx?RecipeId=5, www.whereincity.com/recipes/other-vegetables/fried-cauliflower-2408.htm, www.indobase.com/recipes/category/cauliflower-50.php, www.cdkitchen.com/recipes/cat/489/0.shtml

– सौ. भाग्यश्री केंगे