अफ्रिकन टयूलिप

पळस, पांगारा सारखीच दिसणारी अफ्रिकन टयूलिपची फुले ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखली जातात. त्यांना फाऊंटन किंवा नंदीचे झाड सुध्दा म्हणतात. अफ्रिकेत मूळ असणा-या ह्या झाडांची फुले चंबूच्या आकाराची (cup-shaped) असतात. पावसाचे पाणी किंवा दव फुलांमध्ये साठून राहात असल्यामुळे हमींगबर्ड सारखे अनेक पक्षी ह्या फुलांकडे आकर्षित होतात. ह्या झाडाचे खोडही मऊ असल्यामुळे सुतार पक्षी येथे घरटे करणे पसंत करतात. मुख्यता शोभेसाठी ही झाडे लावली जातात.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Spathodea_campanulata,
mgonline.com/africantuliptree.html,
www.naturia.per.sg/buloh/plants/african_tulip.htm,
www.flowersofindia.net/catalog/slides/African%20Tulip%20Tree.html,
books.google.co.in/books?isbn=0824806980…,
toptropicals.com/html/toptropicals/articles/trees/spathodea.htm,
davesgarden.com/guides/pf/go/2404,
www.tropilab.com/spatodea-cam.html,
www.britannica.com/eb/topic-8405/African-tulip-tree

टबूबिया

टबूबिया वृक्षाच्या शंभराहून अधिक जाती जगभरात पसलेल्या आहेत. टम्पेट ट्री म्हणून ओळखल्या जाणा-या ह्या झाडाची फुले पिवळ्या, गुलाबी, लव्हेंडर, लाल आणि पांढ-या रंगात असतात. बरीचशी अफ्रिकन टयूलिप सारखी दिसणारी परंतु थोडीशी आकाराने लहान आणि चंबूच्या आकाराची टबूबियाची फुले असतात. पक्षी आणि मधमाशांना ह्या फुलांचे खूप आकर्षण असते. फुलांचा बहर थंडी नंतर सुरु होतो. मुख्यता शोभेसाठी लावण्यात येणा-या ह्या झाडांच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Tabebuia,
http://en.wikipedia.org/wiki/Tabebuia_impetiginosa,
mgonline.com/yellowtab.html, www.floridata.com/ref/T/tabe_het.cfm,
books.google.co.in/books?isbn=1561641731…,
www.vassl.com/tropicalgarden1/tabebuia.htm,
floridagardener.com/pom/tabebuia.htm, mgonline.com/pinktab.html,
leavesgrass.blogspot.com/2006/09/tabebuia-tree-ip-amarelo.html,
glance-olhar.blogspot.com/2006/09/tabebuia-tree-ip-amarelo.html

बॉटल ब्रश

वसंत ऋतूत सर्वत्र फुलेले लाल भडक बॉटल ब्रश नेत्रांना सुखावतात. ह्या झाडावर अनेक पक्षी आकर्षित होतात. ह्या झाडाची फुले अत्यंत वैशिष्टयपूर्ण असून ब्रशसारखी लांबट असतात. बॉटल ब्रशची फुले बहुतेकदा लाल असतात तरी त्यात केशरी, तांबडा, हिरवा असेही प्रकार सापडतात. मूळ ऑस्ट्रेलियाची असणारी ही फुले सुरुवातीला अतिशय मंद गतीने वाढतात आणि मग जोम धरतात. मुख्यता शोभेसाठी लावण्यात येणा-या ह्या झाडांच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Callistemon, en.wikipedia.org/wiki/Callistemon,
flowersofindia.net/catalog/slides/Bottle%20Brush.html,
books.google.co.in/books?isbn=3527604995…,
www.burkesbackyard.com.au/1998/archives/26/
in_the_garden/flowering_plants_and_shrubs/bottlebrush,
www.imagesaustralia.com/bottlebrush.htm

चिनार

“हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी” किंवा कवी इकबालने म्हटल्याप्रमाणे “blaze of Chinars it nurses in its bosom”. असा हा मूळचा असणारा चिनार वृक्ष मुख्यता हिमायलाच्या पायथ्याशी सापडतो. ह्या वृक्षाचा घेरही खूप मोठा असून उंची २५ फूटा पेक्षा अधिक असते. काश्मीर मधल्या छ्त्तेरगाम गावी ६० फूट उंच चिनारची नोंद केली गेली आहे. चिनारची फळ मोठी, गोल आकारात आणि काटेरी असतात. हे झाड ४०० वर्षापेक्षाही अधिक जगू शकते. काश्मीरची शान असणारा हा वृक्ष भारतात इतरत्र लागवड करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.
अधिक माहितीसाठी –
http://www.kashmirhub.com/plants-of-kashmir/chinar.html,
http://vitasta.org/2002/1.8.html, www.esrokashmir.org/ccn_kashmir.htm,
http://www.flowersofindia.net/catalog/tree.html,
www.trekearth.com/gallery/photo401735.htm,
www.urbandictionary.com/define.php?term=chinar,
anantnag.nic.in/climate.htm, www.rediff.com/election/2002/oct/11jk.htm,
www.thecheers.org/news/Weird-news/news_16005_
Worlds-oldest-Chinar-gets-company-in-Kashmir.html,
eecho.blogspot.com/2007/11/age-old-chinar-tree-collapses.html

जास्वंद

हिबीस्कस किंवा शू-फ्लॉवर म्हणून ओळखली जाणारी जास्वंद परसबागेतले नेहमीचे झाड. ह्यात लाल रंग जरी कॉमन असला तरी त्यात अनेक रंगाचे आणि जातीचे २००च्या वर प्रकार आहेत. जास्वंदाचे फूल वैशिष्टयपूर्ण असते, चार किंवा पाच पाकळ्यांच्या मधून आलेला तूरा अत्यंत मोहक दिसतो. ही फुले गणपतीला आणि बंगालमध्ये काली मातेला वाहिली जातात. जास्वंदीच्या फुलांचा उपयोग आयुर्वेदात आणि केसांच्या सौंदर्यप्रसाधनातही केला जातो. इतरत्र देशात जास्वंदीच्या उपयोग भाजी, जॅम, हर्बल टी, जमायका (लॅटीन अमेरिका) नावाचे अत्यंत लोकप्रिय पेय करण्यासाठी होतो.
अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Hibiscus, en.wikipedia.org/wiki/Hibiscus_rosa-sinensis, www.trop-hibiscus.com, www.indianetzone.com/5/hibiscus_shrub.htm,
www.exotic-hibiscus.com, www.hiddenvalleyhibiscus.com/care/index.htm,
www.articles411.com/Article/Hibiscus-as-Garden-Plants/9462, http://www.flowersofindia.net/catalog/tree.html, www.strictlyhibiscus.com/care.php

अंगणातली तुळस

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात तुळशीचा घमघमाट असतो. विठोबाला प्रिय असणारी ही तुळस लक्ष्मीचे रुप समजली जाते. विष्णू आणि कृष्णाला प्रिय असणा-या तुळशीचा उल्लेख वेदपुराणात आणि चरक संहितेतही सापडतो. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत. तुळशीचा चहा, वाळलेल्या पानांची पावडर, साजूक तुपा बरोबर, किंवा तुळशीची पाने नुसतीच खाल्ली जातात. दिवाळी नंतर होणारे तुळशीचे लग्नही धामधूमीत पार पाडले जाते. अशी ही प्रत्येकाच्या दारात असणारी तुळस मात्र विठोबाच्या गळयात दिमाखात असते. राम आणि कृष्ण तुळस अश्या दोन प्रकारात असणारी ही तुळस ’ इंडियन होली बसील’ नावाने ओळखली जाते –
en.wikipedia.org/wiki/Ocimum_tenuiflorum, www.organicindia.com/tulsi-facts.php, www.organicindia.com, www.ayurvediccure.com/tulsi.htm, www.omorganics.com/tulsi_article,
www.hindunet.org/day_as_hindu/tulsi.htm, www.boloji.com/environment/32.htm
www.yogamag.net/archives/1981/2feb81/tulsi.shtml, www.holy-basil.com

– सौ. भाग्यश्री केंगे