पुलाव

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - ३ वाटया बासमती किंवा कुठलाही लांब तांदूळ, अर्धी वाटी मटारचे दाणे, १ मोठे गाजर, १ मूठ बेदाणा, १ मूठ काजू-तुकडा, २-३ लवंगा, २-३ दालचिनीचे तुकडे, चवीनुसार मीठ-साखर, साजूक तूप.

कृती - पुलाव करण्यापूर्वी १ तास आधी तांदूळ धुवून पाणी निथळून ठेवावेत. नंतर मोठया पातेल्यात थोडया तुपावर काजू व बेदाणे तळून घ्यावेत. नंतर त्याच तुपात लवंग व दालचिनीची फोडणी करून तांदूळ टाकावेत. तांदूळ जरा परतून घ्यावेत व नंतर तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून, साखर-मीठ घालून भात करून घ्यावा. मटारचे दाणे उकळीच्या पाण्यात टाकून वाफवून घ्यावेत. त्यात चिमूटभर मीठ टाकावे. गाजराचे लांब व बारीक तुकडे करावेत. नंतर हे तुकडे वाफवून घ्यावेत. पुलाव वाढायच्या वेळी मोठया बशीत भात काढून घ्यावा. त्यावर मटार, गाजर, काजू व बेदाणा पसरावा. हा पुलाव करण्यास अतिशय सोपा व चवीला छान लागतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा