साहित्य सम्मेलन मुख्यपान

 

७६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, कराड


कार्यक्रम सूची

माणसाचे मन टिपकागदासारखे असते. कला, वाड्.मय यांचे मनावर होणारे संस्कार फार खोलवर रूजतात. चांगला व संस्कारक्षम माणूस घडविण्यामधे उत्तम साहित्यकृतींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग असतो. साहित्यामुळे आपल्या अनुभव विश्वाचा विस्तार होतो. साहित्याच्या वाचनाने एक माणूस म्हणून देखील आपण जास्त मोकळे होतो, अनेक बाजूंचा विचार करण्याची कुवत साहित्याच्या वाचनातून लाभते. साहित्यिक मेळावे, परिसंवाद, महाविद्यालयीन उपक्रम आणि साहित्य संमेलने साजरी केली जातात ती, प्रामुख्याने वरील उद्दिष्टे मनामधे ठेऊन.

लोकांनी अभिजात साहित्यकृतींकडे वळावे, चौफेर चतुरस्र आकलन शक्ती निर्माण व्हावी यासाठी ग्रामीण भागात जेवढे प्रयत्न करता येणे शक्य आहे, तेवढे केले जातात. पण तरीही ग्रामीण परिसराच्या मर्यादांवर मात करूनही भव्य सोहळे ग्रामीण भागात साजरे करण्याचे उद्दिष्ट ठेवून, कराड जिमखान्याने, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कऱ्हाड शाखेच्या सहकार्याने, ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

७६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराड येथे, दिनांक १०, ११ आणि १२ जानेवारी २००३ या कालावधीत भरणार आहे. कृष्णा-कोयनेच्या प्रीती संगमावर खास उभारलेल्या 'यशवंतराव चव्हाण नगरा'मधे ते संपन्न होईल. संमेलनाच्या ठिकाणी उभारलेल्या प्रवेशद्वाराला 'संत सखू प्रवेशद्वार' हे नाव दिले जाणार आहे.

मराठी भाषेचे भाग्य थोर की तिला ज्ञानदेवांसारखा पहिलाच कवी जो लाभला तो महाकवी, महाज्ञानी व उपरती झालेला सिध्दयोगी होता. पारंपरिक गाणी, धवळे (लग्नामधे वरास उद्देशून म्हटली जाणारी गीते), चक्रधर स्वामींचा 'महानुभाव पंथ' इथून मराठीच्या गंगोत्रीचे पात्र नंतरच्या काळात सतत रूंदावत गेलेले दिसते.

कहाण्यांमधून कथा, कादंबरी असे वाड्.मय, तर गेयता असणारे काव्य, ओव्या, अभंग, उखाणे, आख्यायिका, खंडकाव्य, शाहिरी काव्य, पवाडे, बखर असा अनेक शतकांचा वाड्.मयीन इतिहास मराठी भाषेला लाभला आहे.


संमेलनाचे आयोजन
७५ व्या संमेलनाचे अध्यक्ष - श्री. राजेंद्र बनहट्टी
७६ व्या संमेलनाचे अध्यक्ष - डॉ. सुभाष भेंडे
उद्धाटक - माजी पंतप्रधान श्री. पी. व्ही. नरसिंव्ह राव
स्वागत समिती अध्यक्ष - श्री. श्रीनिवास वि. कुलकर्णी
संयोजन समिती अध्यक्ष - संसदसदस्य श्री. श्रीनिवास पाटील
प्रचीती कार्याध्यक्ष - श्री. सुभाषराव जोशी
कोषाध्यक्ष - श्री. शिरीष गोडबोले
प्रमुख कार्यवाह - श्री. महेंद्रकुमार शहा

कार्यक्रमाचा वृत्तांत
कराड साहित्य संमेलनाचे सांस्कृतिक तसेच सामाजिक मूल्य ध्यानी घेऊन संमेलनाचे इतिवृत्त आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा