बॄहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन मुख्यपान

पुरण पोळी ...भरली वांगी... अटलांटामध्ये!


अटलांटा - ता. ४ जुलै - बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी इथं तीन हजाराहून अधिक मराठी माणसं एकत्र जमली आहेत. गेली ३ दिवस यजमान अटलांटा महाराष्ट्र मंडळाचा पाहुणचार घेत मराठमोळया जेवणावर मंडळी ताव मारत आहेत.

आज तिस-या दिवशी पुरणपोळी, भरलेली वांगी, कांद्याची भजी पुढयात पाहून बृहन्महाराष्ट्र मंडळींच्या तोंडाला पाणी सुटले. एरवी पिझ्झा, बर्गर, टॅको, पास्ता यांना चटावलेली मंडळी पुरणपोळीचा अस्वाद घेत होती. दूरदेशी एकाच दिवशी ३०० मंडळी पुरण पोळी खातात यापेक्षा मोठी दिवाळी कुठली असणार.?

अटलांटा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आहोरात्र परिश्रम करत हे करून दाखवलं आहे. अतिशय आकर्षक रितिने सजविलेल्या भोजनगृहात कार्यकर्त्यांची फौज आदरतिथ्य करण्यात स्वत:ला धन्य मानत आहे.

कन्व्हेशन सेंटरचे (सभागृहाचे) कर्मचारी इथले स्थानिक अमेरिकन आणि मुख्यत: आफ्रिकन अमेरिकन आहेत. गेली ३ दिवस ते ही मराठमोळया भोजनाचा आस्वाद घेत 'नमस्कार', 'या', 'कसे आहात' असे शब्द शिकली आहेत.

त्यांनाही लागला आहे मराठमोळा लळा.

वृत्तांत व छायाचित्र


भागवत सोनवणे
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा