नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

'मनी माऊ'

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके ह्यांना मांजरी फार आवडत. त्यावरचे त्यांचे ’मांजराचा गाव’ पुस्तक मागच्या पिढीने वाचलेही असेल. आजच्या पिढीला वाचनाकडे वळवायचे तर लेखनाबरोबरच पुस्तकाचे सादरीकरणही तितकेच दमदार हवे. प्रथम बूक्स प्रकाशनाने बाजारात नुकतेच आणलेले ’मनी माऊ’ हे पुस्तक दोन्हीची पूर्तता करते. चित्रकार ऋजुता घाटे ह्यांचे लेखन आणि चित्रांकन हे तीन ते सहा वयोगटासाठी योग्य आहे. नुकतेच पुस्तक हाताळायला लागलेल्या चिमुरडयांसाठी मांजरीची रंगीत चित्रे आणि त्यांचे हावभाव हे चांगले बौध्दीक खाद्य आहे. पुस्तकाचे प्रत्येक पान वेगळ्या रंगात आहे. लेखिकेने प्राथमिक वाचकांचा विचार करुन अंक आणि ’ऊ’ च्या आकाराचे यमक चांगले जुळवले आहे. माऊ, खाऊ, पिऊ, जाऊ, येऊ, भिऊ, चाऊ, काऊ, चिऊ, घेऊ, धाऊ, च्याऊ म्याऊ असे छोटयांच्या भावविश्वातले शब्द अधिक समर्पकपणे वापरले आहेत. थोडक्यात छानशी बालकविता लेखिकेने गद्यात चित्ररुपाने मांडली आहे. आई-बाबांनी हे पुस्तक ३-६ वयोगट असणा-या मुलांना जरुर वाचायला द्यावे.

'मनी माऊ'
ऋजुता घाटे 
प्रथम बूक्स

- भाग्यश्री केंगे

हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा