साहित्यिक लेख मुख्यपान

 

'मोडी लीपी' भाषांतर करणा-या वैशाली फडणीस


मराठी इतिहास वाचण्याकरीता आवश्यक असलेली लिपी म्हणजे मोडी लिपी. ही लिपी तेराव्या शतकापासून सुरू झाली. श्री.महादेवराव यादवाचे कारकीर्दीत (इ.स. १२६० ते ११८२) हेमांद्री पंत नामक प्रख्यात महाजनी होऊन गेले. असे मानले जाते की त्यांनी लंके वरून बाजरीचे बी व मोडी लिपी आणली. हयांनी राज्यात अनेक सुधारणा केल्या, राज्यात होणारा पत्रव्यवहार जलद होण्याकरिता देवनागरीच्या लिपीत सुधारणा करून मोडी लिपी तयार केली. पुढे ती ७०० वर्षे व्यवहारात होती. केवळ मराठयांच्या राज्यातच नव्हे तर जेथे जेथे मराठी सत्ता पोहचली तिथे तिकडे मोडीचा वापर होत होता. १९४८ पर्यंत मोडी लिपी प्राथमिक शाळांमध्ये शिकविली जायची. इंग्रजांचा प्रभाव तसेच प्रेसच्या दृष्टीने गैरसोयीचे म्हणून मोडीचा वापर कमी व्हायला लागला. १९७० पर्यंत कोर्टाचे कागदपत्र मोडीत असायचे. परंतु काळानुरुप मोडी पडद्याआड गेली.

देवनागरीची लघुलिपी म्हणजे मोडी होय. बालबोध लिहितांना काना, मात्रा, वेलांटया, दिर्घ हया करीता खूप वेळ लागतो व लिहिण्याचा वेळ वाढतो म्हणून वेळ वाचविण्याकरिता लिपीची निर्मिती झाली. कागदावर सरळ रेष काढून हात कमीत कमी वेळा उचलून जलद गतीने लिहीण्याची पध्दत हया लिपीने निर्माण केली. ही अशी मोडी लिपी वाकडी वळणे घेऊन धावत पळत लिहीली जाते.

हया भाषेत असंख्य कागदपत्रे, दप्तरखाने, देशात अनेक ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई, गुजरात, दक्षिणेत तंजावर येथे खूप कागदपत्रे आहेत. तसेच महाराष्ट्रात घरोघरी सुध्दा असंख्य कागद आहेत. ते वाचण्याकरिता 'मोडी लिपी' येणे अतिशय आवश्यक आहे. हयात असलेला मजकूर वाचल्यामुळे आपणांस खरा इतिहास कळेल. आपल्या पुर्वज्यांनी केलेल्या गोष्टीची माहिती आपणांस कळेल. अशा मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्राचे आपल्या व्यवहारातील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत रूपांतर करून दिले जाते.

संपर्क
सौ. वैशाली मो. फडणीस,
शासन मान्यताप्राप्त
'बेलबाग संस्थान', १७७/१७८, बुधवार पेठ , लक्ष्मी रोड, पुणे ४११००२
फ़ोन ०२०-२४४९३११६, मो। ९८८१६९५५६२

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा