ई- साहित्य संमेलन २०१४ - युनिक फीचर्सचा उपक्रम, मराठीवर्ल्ड डॉट कॉम मिडीया पार्टनर म्हणून सहभागी

युनिक फीचर्सच्या वतीने चौथे ई-संमेलन नाशिकला कुसुमाग्रजांच्या भूमीत संपन्न होत आहे.  ई-बुक, सोशल नेटवर्किंग साईटस्, मराठी ब्लॉग्ज आणि मराठी संकेतस्थळांचं जाळं आता आभासी जगात चांगलंच पसरलंय आणि या दुनियेशी जगभरातल्या लेखक-वाचकांचा संपर्क आहे. संवाद आहे. म्हणूनच इंटरनेटचं माध्यम हाताशी धरत साहित्याला या आधुनिक माध्यमाशी जोडून घेत तीन वर्षांपूर्वी युनिक फीचर्सने ई-संमेलनाला सुरुवात केली.

जगभरात असलेले मराठी वाचक आणि लेखक यांना एकत्र करुन जाणत्यांचे अनुभव समजून घेत असतानाच, नव्या साहित्य उर्मींशी संवाद साधता आला तर लेखक आणि वाचाकांसाठी हा साहित्य प्रवास अधिक समृद्ध करणारा ठरतो यात शंकाच नाही. दुसरं असं की इंटरनेटमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणं सहज शक्य आहे. इंटरनेटवरच्या साहित्यसंमेलनाच्या निमित्तानं काही विचारममंथन व्हावं याच हेतूनं  www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर  हे साहित्य संमेलन गेली तीन वर्ष भरवले जात आहोत.

इंटरनेटसारख्या वेगवान आणि वैयक्तिक माध्यमातून हे संमेलन आकार घेत असल्यामुळे या ई-साहित्य संमेलनात जो मजकूर साईटवर अपलोड केलेला असतो तो सगळा मजकूर वाचकाला त्याच्या सोयीनं, निवांतपणे, सावकाश आणि आनंद घेत वाचण्याची मुभा आहे. वाचलेल्या मजकुरावर विचार करायला आणि त्यावर मत मांडायला पुरेसा वेळ वाचकाला मिळू शकतो. त्यामुळे या ई-संमेलनात होणारं विचारमंथन वाचकांच्या सक्रिय सहभागानं तर होतंच पण त्याचबरोबर विचारांची विविधस्तरीय देवाण-घेवाण करायला यात संधी मिळते. 

ई-साहित्य संमेलनाला लाभलेले अध्यक्ष

ई-संमेलन २०१४ साठी ख्यातनाम साहित्यिक ना. धो. महानोर - अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. ह्या वर्षी मराठीवर्ल्ड डॉट कॉम ही साईटही युनिक फीचर्सच्या उपक्रमात मिडीया पार्टनर म्हणून सहभागी झाली आहे.

मागील तीन वर्षांचे अध्यक्ष पुढील प्रमाणे

२०११ -  रत्नाकर मतकरी
२०१२ - कवि ग्रेस
२०१३ - भालचंद्र नेमाडे

अधिक माहितीसाठी युनिक फीचर्स  ह्या वेबसाईटला भेट द्या.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा