अधिक पुस्तके मुख्यपान

 

सावळया रे...


२७ फेब्रुवारी २००० रोजी 'मराठीवर्ल्ड.कॉम'ला सुरवात झाली. तेव्हापासून विविध विभाग, नवनवीन माहिती ही आम्ही सातत्याने रसिक वाचकांना देत आलो आहोत. 'सावळया रे,...' या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या अनघा दिघे यांच्या कवितासंग्रहाची ई-आवृत्ती गोपाळकाल्याच्या (७ सप्टेंबर २००४ ) मंगल समयी, प्रसिध्द केला.वाचकराजांच्या पसंतीस हा प्रयत्न तसेच 'सावळया रे,...'मधील कविताही उतरतील असा विश्वास आम्हाला वाटतो.

'सावळया रे,...' हा राधा, कृष्ण आणि मीरा यांच्यातील नात्यांचा मागोवा आहे. तरल, भावस्पर्शी असे हे दीर्घकाव्य वियोगातील प्रेमाचे तसेच सफळ प्रेमाचे अनेक पदर उलगडत नेते.

'मीरेचं व्रत मुकं
कान्ह्याशी बोलतं
नि:शब्दाचं वेड तिचं
कान्ह्यालाच कळतं'
इथपासून सुरवात करून
'कान्ह्याचं स्वप्नं
अश्रुंतून ओघळतं
कान्ह्याचं सत्य
मीरेला वेडावतं...'

हुंदक्यासारख्या या दोन निसटत्या अभिव्यक्तिंच्या दरम्यान घडलेली ही 'अनोखी कहाणी'- सर्वांनीच वाचावी..., संग्रही ठेवावी अशी...
पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. हे पुस्तक ऍक्रोबॅट पी.डी.एफ्. स्वरूपामध्ये सादर केले आहे. हे पुस्तक उघडण्यासाठी ऍक्रोबॅट रीडर या सॉफ्टवेअरची जरूरी आहे. तुमच्या संगणकामध्ये ऍक्रोबॅट रीडर नसल्यास सदर सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा