साहित्यिक मुख्यपान

 

विश्राम बेडेकर - मानाचा मुजरा : एका दीपस्तंभाला!


नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे जन्मशताब्दी वर्ष. वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे.

चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती.

चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा त्यांना मिळालेला योग्य सन्मान!मराठी सारस्वताच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी १३ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. या निमित्ताने 'एक झाड आणि दोन पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र पुन्हा एकदा १० वर्षांनी प्रकाशित होतेय. पॉप्युलर प्रकाशनातर्फे हे पुस्तक १३ तारखेला पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा