दागदागिने मुख्यपान

 

हाताच्या बोटांतील दागिने

दुस-या शतकापासून हातांची बोटे सजवण्यासाठी अंगठया घालण्याची सुरुवात झाली. मातीच्या, लाकडाच्या, लोखंडाच्या, विविध मुद्रा, किंवा चिन्ह असलेल्या अंगठया वापरल्या जात. अंगठयामध्ये आरसाही वापरला जात. तर्जनीत चंदन, चांदी, हस्तीदंत, सोने यांपासून बनविलेली अगंठी घालण्याची प्रथा होती. या चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठीला 'वेढा' किंवा 'वळ' म्हणतात. मधल्या बोटात सिक्का घातला जाई. रूप्याची व हि-याची अंगठी मुख्यत: अनामिकेत तर छल्ला किंवा मुदी करंगळीत घालण्याची पध्दत होती.


 

 

 
 

कटीभूषणे

 

पूर्वी कटीभूषणाचा उपयोग स्त्री व पुरूष दोघेही करत. त्या काळी कमरपट्टा, मेखला, रशेना, माचपट्टा, साखळया, करकोटा, ही कटीभूषणे वापरत. कटीभूषणे ही बहूदा चांदीची असत. मराठे-पेशवेकाळात नऊवारी साडीवर स्त्रिया कंबरपट्टा घालत. ब-याचवेळा या कंबरपटटयाच्या मध्यभगी खडा असत. उपनयनाच्यावेळी मुंजाच्या कमरेला जे तृणाचे कटीसूत्र बांधले जात त्यास मेखला म्हणतात.
आज या सर्व कटीभूषणांची जागा लहान अश्या छल्ल्याने घेतली आहे.

कबंरपट्टा 

हा दागिन्यांमधील अतिशय जुना दागिना आहे. राजघराण्यातील राण्या नऊवारी पातळावर कबंरपट्टा लावत त्यामुळे त्या अगदी रुबाबदार वाटत. हा पट्टा ऍक्युप्रेशरचे काम करतो त्यामुळे पाठदुखी सारख्या विकारांना आळा बसतो. तसेच यामुळे पोटाचा घेर प्रमाणात रहातो.

मेखला 

हा कमरेच्या एका बाजुला लटकणारा दागिना आहे. यात नक्षीदार साखळी/वेल असतात. ह्याला दोन टोके असतात. एक टोक साधारण पोटाच्या बाजुला अडकवतात व दुसरे टोक थाडे अंतर सोडून पाठीच्या बाजूला अडकवतात.

छल्ला

हे कटीभूषण भारतात प्रचलित आहे. बहुतांशू ठिकाणी ते वापरेले जाते. छल्ल्यामध्ये वरच्या बाजुस नक्षीदार प्लेट असते. व पाठीमागच्या बाजूस किचेन सारखे चाव्या अडकविण्यासाठी जागा असते.

 

 

 
 

पद्मभूषणे

जोडवी
अंगुष्ठा

पैंजण, तोरडया, वाळे, चाळ ही पद्मभषणे चांदीचीच असतात. कारण चांदी थंड असल्याने पायातील उष्णतेस ती प्रतीरोध करते.

 पैंजण हे एकपदरी असतात. तर तोरडया व वाळे जाडजुड असतात. वाळे हे तांब्याचे सुध्दा असतात. लहान मुलांच्या पायात असे तांब्याचे वाळे घालण्याची पध्दत आहे. चाळ हे नृत्यांगना वापरतात. चाळात अनेक घुंगरे असतात. ही शक्यतो पितळेची असतात. हातातील बोटांप्रमाणे पायातील बोटेही सजवली जात. पायाच्या अंगठयात अनवट अंगुष्ठा नावाचे जाड कडे, दुस-या बोटात जोडवी किंवा विरोद्या व चौथ्या बोटात मासोळी तर करंगळीत वेढणी घालण्याची पध्दत होती. 

तोरडया पैंजण
 
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF