लोकजीवन मुख्यपान

पार हद्दपार

भारतात आजही शहरी आणि ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती आहेत. ग्रामीण संस्कृतीत गावचा 'पार' म्हणजेच सार्वजनिक ओटा अत्यंत महत्त्वाचा. पार म्हणजे जेथे गावकरी महत्त्वाच्या चर्चेसाठी,  निर्णय घेण्यासाठी, रक्षणासाठी किंवा सहजच गप्पा मारण्यासाठी ज्या  सार्वजनिक ओट्यावर एकत्र येतात त्याला पार असे म्हणतात. पार हे एक ग्रामीण संकृतीत माध्यम म्हणून महत्वाची भूमिका निभावते.

ग्रामीण भागात लोकजागृती घडवून आणण्यासाठी पार हे  माध्यम महत्त्वचे ठिकाण आहे. ग्रामीण भागात गावाच्या केंद्रस्थानी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली गोल स्वरुपात ओटा बांधला जातो.  पूर्वी पारावर गावातील महत्वाचे  निर्णय घेतले जात. या  निर्णय प्रक्रियेत गावाचे पाटील, सरपंच तसेच गावातील सर्व नागरिक सामिल असत. गावातील लोकांचे तंटे सोडविले जात. ग्रामपंचायातही तिचे  निर्णय सुनावत असे. पूर्वी पारावरच गावातील शाळाही भरत असे. गावातील विदयार्थी  येथे एकत्र येऊन शिक्षण घेत. गावाच्या विकासापासून ते राजकारणापर्यंत सर्व काही चर्चा याच ठिकाणी होत. गावाचा गावगाडा  याच ठिकाणाहून चालविला जात असे. ग्रामपंचायतची निर्मिती झाल्यामुळे पारावर ग्रामपंचायत भरणे बंद झाले आहे. मात्र गावचर्चा काही प्रमाणात पारावर होताना आजही दिसते. 

पार गावाच्या  केंद्रस्थानी  असल्यामूळे गावात नवीन पाहुणे आले तर त्यांना गावाची सर्व माहिती येथे बसलेल्या लोकांकडून मिळत असे. याठिकाणी गावातील वृद्ध लोकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच मंडळी बसत. आपला वेळ घालवण्यासाठी, गाव-गप्पा करण्यासाठी लोक येथे एकत्र येत. याठिकाणी बसून गावगाड्याविषयी चर्चा करीत. तसेच बाजार-गप्पा येथे करत. गावाचा पारावर एखादा विषय चर्चीला गेला की गावभर तो विषय पोहचत असे. आज  माध्यमे जी भूमिका बजावत आहे तशीच भूमिका पूर्वी पार बजावत असे. गावातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पार हे संदेश महत्वाचे माध्यम होते. आजच्या युगात ज्याप्रमाणे  फेसबुक, गुगल, ओर्कुट, याहू ही संकेतस्थळे तश्याच प्रकारे पार हे गावातील महत्त्वाचे संदेश वाहक स्थळ होते. 

इतिहासाची साक्ष देणारे पार आजही ग्रामीण भागात दिसतात. मात्र बदललेल्या काळानुसार तेही आता ओस पडत आहे. आजच्या नवीन पिढीला पाराची ओळख मराठी चित्रपटातून होते. इंटरनेटच्या जगात फेसबुक, गुगल,  ही संकेतस्थळे नव्या पिढीचे पार आहेत. मात्र जुन्या पारांचे अस्तित्व, आठवणी तेथील आनंद घेण्यासाठी  आजच्या पिढीला पुन्हा पारावर जमावे लागेल हे नक्की.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF