fb tw gp


मराठीवर्ल्ड डॉट कॉमचे पंधराव्या वर्षात पदार्पण

नमस्कार,
मराठी दिनाच्या शुभेच्छा. कै. कुसूमाग्रजांना अभिवादन करुन आज २७ फेब्रुवारी मराठीवर्ल्ड डॉट कॉम पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे. मराठीवर्ल्डच्या प्रवासात आम्हाला अनेक मान्यवरांचे आशीर्वाद आणि प्रेम लाभले. मराठीवर्ल्डसाठी आपले योगदान देणारा प्रत्येकजण सन्मानिय आणि ह्या कुटूंबातला खास आहे. त्यामुळेच अमेरिका, युरोप, न्युझिलंड ते अगदी इंदूर, सातारा, रत्नागिरी, बीड, नागपूर, डोंबिवली, दादर, गिरगाव, बंगलोर, हैद्राबाद अश्या जगभर विखूरलेल्या मराठी माणसांना मराठीवर्ल्ड 'आपली' साईट वाटते.

आमच्या ह्या प्रवासात भेटलेल्या आणि परिवारात सामिल झालेल्या लेखक, कवी, वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृतपत्रे, वृतवाहिन्या, प्रकाशक, सायबरएजचे तंत्रज्ञ ह्यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. ह्या सर्वांमुळे ही वाटचाल खरोखरच सुकर झाली आणि मराठीवर्ल्ड डॉट कॉम अधिक समृध्द झाले. आपला हा ई-सहवास आणि प्रेम अधिक वृध्दीगंत होवो हीच मराठी मातेच्या चरणी प्रार्थना.
मराठीवर्ल्ड परिवार

महाराष्ट्र आणि मराठी इतिहास

मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस! याच चालीवर असे म्हणता येईल की, 'ग्यानबा - तुकाराम' हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? अधिक वाचा...

 

स्वराज्य प्रेमी लोकमान्य टिळक
टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती.
अधिक वाचा...

 

पारंपारीक एकतारी
वारक-यांचे वर्णन करायचे तर कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग असेच करता येईल. कीर्तनातील एक अविभाज्य अंग म्हणून एकतारीचा वापर संत आणि फकीर करीत असत. अधिक वाचा...

 

खाशी मराठी पंगत
पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे. अधिक वाचा...

 

पत्रमुद्रासंग्राहकता
पोष्टाची तिकीटे जमविण्याचा छंद (इंग्लीश शब्द 'फिलाटेली') हा संग्राहक छंदाचा 'राजा' मानला जातो. एकेकाळी राजेलोक अथवा तत्सम व्यक्तीही हा छंद जोपासत. म्हणून याला 'छंदाचा राजा आणि राजांचा छंद' असेही म्हटले जाते. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज,महाराणी एलीझाबेथ, अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट, मिस्त्र देशाचे शाह फाऊद, त्यांचा पुत्र शहा फरुख, ऑस्ट्रेलियातील काउंट फिलिप फेरेरी,स्वीडनचे कर्नल हन्सलगर फोक,रशियातील एगर्थन फेबर्ज अशी कांही विदेशी व्यक्तींची नावें या संदर्भात घेतली जातात. अधिक वाचा...

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF