आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत जो महोत्सव असतो तो दिवाळी किंवा दीपावली या नावाने साजरा करतात. दीपावली हा दिव्यांचा सण आहे. मातीच्या पणत्यांमध्ये तेल-वात घालून जागोजागी ते लावून दिवाळी साजरी केली जाते. तुम्हा-आम्हांच्या जीवनांत असलेला अंधकार, नैराश्य दूर करायलाच जणू ही दिवाळी येते.

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी) - सोमवार २०/१०/२०१४
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पध्दत आहे. अधिक वाचा...

 

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) - मंगळवार २१/१०/२०१४
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. ह्या दिवशी दिवा अंगणात मुद्दाम दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. ह्याला 'यमदीपदान' असे म्हणतात. अधिक वाचा...

 

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी) - बुधवार २२/१०/२०१४
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. अधिक वाचा...

 

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या) - गुरुवार २३/१०/२०१४
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, मोत्यांचे दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते अशी धारणा असल्याने पुष्कळ ठिकाणी लोक या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात. अधिक वाचा...

लक्ष्मीपूजन मुहूर्त : सायं ०६.०९ ते रात्री ०८.३९

 

पाडवा (कार्तिक शुध्द प्रतिपदा) - शुक्रवार २४/१०/२०१४
या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला तबकांत ओवाळणी घालतो. अधिक वाचा...

 

भाऊबीज-यमद्वितीया (कार्तिक शुध्द द्वितीया) - शनिवार २५/१०/२०१४
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. अधिक वाचा......

 
 
 

भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. अधिक वाचा...

 

पोशाख सुरुवात ( मध्ययुगीन पोषाखाचे स्वरूप )
इसवी सनाच्या सातव्या शतकापासून पुढे मुसलमानी सत्ता भारतात उदयास येईपर्यंत भारतातील पोशाकांमध्ये अनेक बदल होते गेले. मात्र अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या काळात भारतीय पेहेरावावर मुस्लिम पेहेरावपद्धतीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. तरीही भारतीय वैशिष्ट्य त्यात टिकून राहिलेच. अधिक वाचा...

 

तोरणमाळ
उंचीने महाबळेश्वर पाठोपाठ महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ होय. समुद्रसपाटीपासून ११४३ मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. राज्यातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे विकसित न झाल्याने हे स्थान केवळ उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांचेच विशेष आकर्षण आहे. अधिक वाचा...

 

कोहोजगड
या पावसाचा, निसर्गाचा आणि ट्रेकिंगचा आस्वाद घ्यायचे ठरले. पालघरमध्ये वाडा येथून काही अंतरावर बसने वाघोटा येथे 'कोहोजगड' आहे. ठाणे स्थानकापासून अडीच तासांत गडाजवळच्या रस्त्यावर आलो आणि मन एका क्षणात शिखरावर पोहोचले. अधिक वाचा...

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF