सावली – कवितासंग्रह

sawali आजकाल बाजारात नवे छोटेखानी कवितासंग्रह प्रसिध्द होत असतात. कवी रणजीत कुबेरकर यांचा ‘सावली’ हा कवितासंग्रह बोरिवलीच्या ‘अस्मि प्रकाशनने’ नुकताच प्रकाशित केला आहे. उत्कृष्ठ मुखपृष्ठ, सुंदर छपाई व उत्तम कागद यामुळे या हँन्डीपुस्तकाचे रंगरूप आकर्षक झाले आहे. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या प्रतिक्रिया मागील कव्हरवर छापल्या असून त्यामुळे एकदंर पुस्तकातील कवितांचा बाज काय आहे, वाचकांच्या ध्यानात येते.

बाहेरच जगातल्‍या नानाविध घडामोडींचा आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. मध्यमवर्गीयांच्या इच्छा आकांक्षा, राग, लोभ,प्रेम, विरह, थट्टा, मस्करी या अनुभवांना रणजीत कुबरेकर यांनी ‘सावली’ या कवितां संग्रहतून शब्दबध्द केले आहे.
‘तू आणि पाऊस’,’विसर्जन’,’काल आणि आज’, ‘तुला माहीत आहे का?’ या त्यातील वाचनीय कविता आहेत. प्रेमभंग या कवितेमध्ये कुबेरकर म्हणतात.

“तू गेलीस निष्काळजीपणे
एखाद्या बेफाम अश्वासारखी
भावनांना कुस्करीत
पुढे एखादी माळीण येईलही
भावनांना पुन्हा एकदा टवटवीत करेल
नव्या आशा पल्लवीत करेल
पण मला भिती वाटते
त्या भावनांना पाणी तिचं असलं
तरी सुगंध तुझाच येत राहील
सुगंध तुझाच येत राहील!

‘प्रेमभंग’ या कवितेतील या ओळी संवेदनशील मनाला व्याकुळ करतात. कुबेरकरांची ‘घर’ ही कविता प्रत्येकाच्या मनात घर करेल अशी असोशी त्या कवितेमध्ये आहे. निराळेच तपशील टिपून घेण्याची त्यांची हातोटी आपल्याला पुढील ओळीतही दिसून येते.

आज जां भई देतांना
भावना अनावर होतात
जड झाले त्या पापण्या
बरचं काही बोलून जातात
संथपणे उघडझाप करून
आम्हा आळशांची मने व्यथा उघड करतात

‘मनो व्यथा आळशोची’ ह्या कवितेतील धम्माल सही ओळी वाचताना मनाला गुदगुल्या होतात. हसायला येत राहतं. ‘सावली’ कवितासंग्रहाच्या शेवटी ‘चादर’ शीर्षकाची एक कविता आहे. एका चांदरीला वाटतं, की आपला चांगला वापर होईल. अलिशान बैठकीमध्ये सजावटीसाठी किंवा स्वस्थ जीवनाचा आपण एक नमूना बनू. आपल्याला ग्राहक/मालक मिळेल. पण अखेरीस ती चादर ईस्त्रीवाल्याच्या गोणपाटावर सजते. तिचा भ्रमनिरास व्यक्त करतांना, कुबेरकर लिहीतात.

आज चादर निश्चलपणे पहुडली आहे
मालका सोबत, खाली जमिनीवर
डोळे पाणावतात तिचे सांगताना,
डोळे पाणावतात तिचे सांगताना,
“हाच माझा खास वापर….!

डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी कुबेरकरांना दिलेल्या शुभेच्छामध्ये ते सांगतात की, “आपल्या कविता आवडल्या. मानवी भावनांचे विविध नमुने त्यातील बारकावे आपण आपल्या प्रेमकवितेत सहजपणे उलगडले आहेत. तर अन्य कवितांमधून आपली सूक्ष्म निरीक्षण शक्ती प्रत्ययास येते. हा कविता निश्चितच प्रकाशात येण्याजोगा आहे.

प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा हा छोटासा संग्रह २५रु. किंमतीला उपलब्ध असून, आपल्या ‘तिला’किंवा ‘त्याला’ खास प्रसंगांनाही हा भेट देता येईल.

रसग्रहण – आरती मराठे

पुस्तकसावली – कवितासंग्रह
लेखक – रणजीत कुबेरकर
किंमत – रु. २५ रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.

तुझ्याचसाठी

thujyasathi ‘तुझ्याचसाठी’ हा चारोळी संग्रह असून हया पुस्तकाला प्रसिध्द कवियत्री डॉ. मंगला वैष्णव यांची प्रस्तावना आहे. या संग्रहात प्रियकराला त्याच्या प्रेयसीबद्दल वाटणा-या गोष्टींचे भावात्मक वर्णन चार ओळींच्या आधारावर केलेले आहे. ब-याच ठिकाणी यमकाचं सामर्थ्य अधिक जाणवतं. हा संग्रह विशेषकरून युवापिढीसाठी काढलेला आहे आणि प्रतिसादाच्याबाबतीत युवापिढी इतकाच प्रतिसाद प्रौढ वर्गाकडूनही मिळालेला आहे.

पुस्तकसावली – कवितासंग्रह
लेखक – श्री. प्रविण देशपांडे, श्री. अनिरूध्द भाले
प्रकाशक – श्री. अशोक उजळंबकर, औरंगाबाद
किंमत – रु. २० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.