MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मुहूर्त :-
भारतात मुहूर्ताला अतिशय महत्त्व दिले जाते. मुहूर्ताशिवाय कुठलेही शुभ काम केले जात नाही. विवाह गोरज किंवा गोपाळ मुहूर्तावर होतात. मुहूर्त म्हणजे एका विशिष्टय वेळी कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करण्याची वेळ. या मुहूर्तावर कार्यारंभ केला तर कार्य यशस्वी होते. लाभदायक ठरते अशी आपली कल्पना असते. असा आपला भ्रम किंवा गैरसमजूत असते की काही 'वेळा' या शुभ असतात तर काही अशुभ असतात. प्रत्यक्षात कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ नसते. ती आपली कल्पना मात्र असते. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की त्यांना राष्ट्रपती शपथविधीची कुठलीही वेळ ही शुभच आहे.
आपल्याला माहितच आहे पृथ्वी स्वत:भोवती फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालते. तिचा प्रदक्षिणेचा जो कालावधी असतो त्याला आपण वर्ष म्हणतो आणि स्वत: भोवती फिरते त्याला आपण दिवस म्हणतो. आपण दिवस हा तास, मिनिटे व सेंकद यात विभागतो. प्राचीनकाळी भारतात हाच कालावधी प्रहर, घटिका, पळे यात विभागला जात असे. रोजचा हा काळ जीवन सुलभ बनवण्याचा हा एक मार्ग आहे. हे सर्व आपण मानतो. आपले काल विभाजन-वर्ष, दिवस, तास, मिनिटे, सेंकद हे निसर्ग निर्मित नाही. पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे व सूर्याभोवती फिरणे व सूर्याभोवती फिरत प्रदक्षिणा घालणे हे जर शुभ किंवा अशुभ नाही तर त्यावरून कल्पना केलेले काल (वेळ) विभाजन शुभ अथवा अशुभ असणे शक्यच नाही हे ध्यानात घ्यावे.

डॉ. सुधाकर कलावडे


आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.