MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठीवर्ल्ड > उद्योग > उद्योगवार्ता


नाशिकची सायबरएज सोल्यूशन्स एशियन बॅंकरच्या पुरस्काराने सन्मानित,
श्री अनुराग केंगे ह्यांचा सिंगापूर येथे सत्कार.

The Asian Banker Technology Implementation Award 2010गेले १५ वर्षांपासून नाशिकमध्ये कार्यरत असलेली सायबरएज सोल्यूशन्स (पूर्वाश्रमीची सायबरटेक नेटवर्क्स ) ही वेबसॉफ्टरवेअर संस्था सातत्याने प्रगोशील उपक्रम राबवत आलेली आहे. नाशिक शहराची पहिली वेबसाईट www.nashik.com तसेच मराठी भाषेतील पहिले पोर्टल www.marathiworld.com ह्यामुळे ही संस्था नाशिककर तसेच परदेशी भारतीयांमध्येही सुपरीचीत आहे. ह्या पुढचे पाऊल म्हणजे सायबरएज सोल्यूशन्सने YES बॅंकेकरीता तयार केलेले वेबवरचे मनुष्यबळ विकास (Human Resource implementation) च्या सॉफ्टवेअरला अशिया खंडातून पहिला क्रमांक मिळाला आहे. सायबरएज सोल्यूशन्सचे संस्थापक आणि सीईओ श्री.अनुराग केंगे ह्यांचा सिंगापूर येथे सत्कार समारंभात प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ह्याबाबत माहिती देतांना श्री केंगे म्हणाले, " गेल्या काही वर्षांपासून webbased HR softwares हे आमच्या कंपनीचे वैशिष्टय ठरले आहे. भारतातल्या काही अग्रगण्य कॉपोरेट्समध्ये आमची ही सॉफ्टवेअर्स वापरली जातात. कॉर्पोरेट बॅंकसाठी तयार केलेल्या HR software ला हा पुरस्कार मिळाला आहे. ह्या पुरस्कारासाठी अशिया, आखाती देश आणि मध्य अशियातल्या ५० विविध फायनानशियल संस्थांकडून नामांकने आली होती. अशियातल्या काही अग्रगण्य आणि तुलनेने मोठ्या असलेल्या कंपन्या स्पर्धेत असतांनाही सायबरएज सोल्यूशन्सला मिळालेला हा मान आमच्या सायबरएज टीमच्या आणि सीटीओ राजेश शेठ ह्यांच्या मेहनतीचे फळ आहे" असे त्यांनी आवर्जून सांगितले.

The Asian Banker Technology Implementation Award 2010हा पुरस्कार The Asian Banker तर्फे भव्य सोहळ्यात हा प्रथम पुरस्कार श्री अनुराग केंगेना देतांना श्री. क्रीस कॅपफर, एशियन बॅंकर रिसर्चचे मुख्य, म्हणाले की, "सायबरएज सोल्यूशन्सने तयार केलेले हे HR software संस्थेच्या रोजच्या गरजा पूर्ण करतेच पण त्यापलिकडे जाऊन काही वैशिष्टयपूर्ण फीचर्सही त्यामध्ये एकत्रित करण्यात आली आहे ज्यामुळे ख-या अर्थाने संस्थेला मनुष्यबळ विकास साधन्यास मदत होते. हे सॉफ्टवेअर डिसाईन करतांना बॅंकेच्या गरजांचा आणि विकासाचा अत्यंत सुक्ष्मपणे विचार केला गेला आहे." पुरस्कार ठरविण्याची ही प्रक्रीया गेले दोन महिन्यांपासून चालली होती. पुरस्कारांच्या परीक्षकांमध्ये विविध देशांतले अर्थसल्लागार, अर्थशिक्षण तज्ञ आणि कॉर्पोरेट बॅंकींग क्षेत्रातले उच्च अधिकारी होते. त्यामध्ये The Asian Banker Technology Implementation Awards 2010 चे मानकरी नाशिकची सायबरएज सोल्यूशन्स ही सॉफ्टवेअर संस्था ठरली.

अधिक माहितीसाठी www.cyberedge.co.in


- आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा - मुख्य पान

 


 

 

 
















 

 




     
 
 
     
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.