मातृत्व
प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. बालसंगोपन यशस्वीपणे व सुजाणपणे करणे ही आजच्या आई बाबांची जबाबदारी आहे. अपत्य जन्म ही घटना योगायोग नसावा त्याउलट माता पिता दोघांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलेला असावा.
शरीरविज्ञानशास्त्रज्ञ, तत्वज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचे असे मत आहे की विवाहानंतर कमीत कमी दोन वर्षांनी गर्भधारणा होण्यास योग्य काळ असतो.
बाळाच्या प्रत्यक्ष जन्माआधीपासूनच आई बाबांना त्यांची शारीरिक व मानसिक तयारी करावी लागते.
बाळाचा जन्म होतो तेव्हापासून त्याचा जन्म न होता खरे तर तो गर्भधारणेच्या क्षणांपासून सुरू होतो. हा पाया जितका मजबूत व निकोप असेल तितकीच इमारत भव्य व सुंदर दीर्घायु होईल.
|
|
|