MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

सखी > मातृत्व > दुसरे सत्र - ४-५- ६ वा महिना

१३ ते २८ आठवडे

2nd Trimesterचौथा महिना लागताच तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल. पहिल्या तीन महिन्यातली मळमळ, अन्नावरची वासना नसणे, थकवा सर्व हळूहळू कमी होऊन अधिक स्फूर्तीदायक वाटेल.4th Month
आता तुमच्या बाळाची शारीरिक रचना पूर्ण झाली असेल १४ व्या आठवडात तुमचे बाळ डोक्यापासून ते पायापर्यंत ४ १/२" लांबीचे असेल तसेच वजन साधारणपणे ४५ ग्रॅम असेल. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल साधारण पणे १८ ते २२ आठवडापर्यंत ही हालचाल तुम्हाला जाणवायला लागेल.

लघवीच्या व शौचाच्या तक्रारी - पाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्रपिशवी
(bladder)< वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. शरीरातल्या हारमोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते.

 

20 weeks
20 weeks
5 months
5 months
२० आठवडे
२० आठवडे
५ महिने
५ महिने

5 th Monthह्याच दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल.
आता तुमच्या गर्भाशायाचा आकार वाढल्याने तुमचे पोट दिसू लागेल. तुमचा गर्भ २२ आठवडाचा असतांना जवळ जवळ १ पौंडाचा असेल तसेच १० १/२" उंचीचा असेल. इतर अवयवांबरोबरच भुवया व पापण्या येतील. २४ व्या आठवडा दरम्यान डोळ्यांची उघडझाप करू लागेल. २४ ते २८ आठवडादरम्यान तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल. २८ आठवडात तुमचे दुसरे सत्र संपेल. हे सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल.

मातृत्व मुख्य पान