| सखी > मातृत्व > तिसरे सत्र - ७ , ८ व ९ वा महिना |
|
तुम्हाला स्तनांमध्ये बदल जाणवू लागतील, स्तनामध्ये सूज किंवा नाजूकपणा (tenderness)जाणवेल. स्तनाग्रांच्या भोवती असणारा काळा भाग (areolas) अधिक गडद तसेच मोठा होईल.
तुमचं बाळ आता २९ आठवडाच असेल. बाळाची वाढ आता झपाटाने होणार तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येणार. तुमच्या बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास lanugo म्हणतात. तसेच बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास vernix म्हणतात. तुमच्या बाळाच्या मेंदूची तसेच फुफ्फुसाची वाढ झपाटाने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोहोचत असते. बाळाची हालचाल आता तुम्हाला अधिक परिचयाची होते. प्रखर उजेडाला बाळाचे डोळे उघडझाप करू शकतात. आवाजाला प्रतिसाद देतात. जशी जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा.
बाळंतपणासाठी घरची तयारी 
तुम्ही प्रसुतिगृहात नाव नोंदविले तरी तुमच्या घरी बाळंतपणासाठी आवश्यक साबण, रबरी कापड, कापूस व कापडी गॉज, नाळ बांधण्यासाठी सुती दोरी, स्थानिक स्वच्छतेसाठी नवीन ब्लेड व जंतुनाशक द्रव (डेटॉल, सेट्रिमाइड इ.) तयार ठेवावे.
साधारणपणे कळा यावयास लागल्यावर प्रसुतिगृहात/इस्पितळात जातात, पण कळा न येताही अंगावरून पांढरे पाणी जाऊ लागले, वारंवार लघवीला जावे लागत असेल तर इस्पितळात भरती होणे योग्य ठरेल.
|
|


|
|
|