धूलिवंदन

dhulivandan होळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. अधिक वाचा…

माथेरान

matheran मुंबई आणि पुणे इथून सर्वात जवळचे आणि तरीही निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २,६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले. मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. अधिक वाचा…

मराठी कोश वाड्मय

learn मराठी अक्षर वाङ्मयाचा विचार करू लागल्यावर मराठी कोश-साहित्याचा विचार करणे अत्यंत अगत्याचे आहे. कोणत्याही भाषेतील कोश साहित्य हे समाजाचे विचार आणि संस्कृती यांचे संचित धन मानले जाते. ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशांची निर्मिती होते ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणा-यांना जरूर ते संदर्भ अल्प वेळात आणि अल्प प्रयासाने शोधण्याचे विश्वासार्ह साधन म्हणजे कोश होत. अधिक वाचा…

मराठी संत

sant-dnyaneshwar बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी? पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे. अधिक वाचा…

खाशी मराठी पंगत

marathi-pangatमहाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला. अधिक वाचा…

मराठी विवाहसोहळा

Vivah हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे. ‘अनंता वै वेदाः’ म्हणजे वेद अनादी आहेत. जी गोष्ट प्राचीन आहे , ती जगन्मान्य आहे. ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरूषसूक्तामध्ये केली आहे. वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जावेत असे म्हटले आहे. त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे. विवाह ह्या शब्दाची व्युत्पत्ती वि + वह् अशी आहे. विशिष्ट मार्गाचे जीवन, कुळ, समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. विवाह हा हिंदुंचा ‘संस्कार’ आहे, ‘करार’ नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. अधिक वाचा…

श्लोक, स्तोत्रे व प्रार्थना

pratah-smaran वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।। अधिक वाचा…


अन्न हे पूर्णब्रम्ह

ann-he-purnabramha

मधल्या वेळचे पदार्थ
milk-pohe व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास… 

 

भ्रमंती

bhramanti

भीमाशंकर मंदिर
bhimashankar भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे… 

 

 

 

संस्कृती

sanskruti

पारंपारिक पेहराव
parkar-polk पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी… 

 

कला-क्रिडा

kala-krida

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
sulochana-chavan १७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम… 

 

 

 



सृष्टीरंग

अंतराळ ही एक गूढ पोकळी
antaral अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…

मुक्तांगण

नवचैतन्य भविष्याचे…
srushti nerkar राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…