मुखशुध्दी मुख्यपान

जिरागोळी


साहित्य - २० ते २५ आमसुले, अर्धा चमचा मीठ, १ चमचा जिरे, १ चमचा साखर, २ चमचे पिठी साखर.

कृती - पिठी साखर सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करून चिकट होईपर्यंत वाटावे. नंतर ह्या वाटलेल्या मिश्रणाच्या हाताने छोटया छोटया गोळया कराव्यात. ह्या गोळया एक दिवस उन्हात वाळवाव्यात. नंतर त्या गोळया पिठीसाखरेत घोळवून बाटलीत भरून ठेवाव्यात.

ओवा-शोपा


साहित्य - ३ वाटया बडीशोप, पाव वाटी ओवा, पाव वाटी बाळंतशोपा, आर्धी वाटी तीळ, १ छोटा चमचा मीठ, १ वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, आर्धी वाटी पाणी.

कृती - प्रथम मीठ पाण्यात विरघळून घ्यावे. परातीत बडीशोप, बाळंतशोपा घेऊन त्यांना मीठाचे पाणी लावून रात्रभर ठेवावे. दुसर्‍या दिवशी ते मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे, नंतर ओवा, तीळ, खोबर्‍याचा किस हे पदार्थ मंद आचेवर वेगवेगळे भाजून घेऊन बडीशोप व बाळंत शोपांमध्ये एकत्र करावे. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

ह्या शोपांमुळे पोट चांगले रहाते, पोटात गॅस होत नाही. बाळांतीणीसाठी ह्या उपयुक्त असतातच पण त्यांनी तोंडाला चव सुध्दा येते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF