बालनगरी मुख्यपान

 

छोट्यांच्या पाककृती

तुम्हाला सारखी भूक लागलेली असते. ती सुध्दा तुमच्या आवडीच्या पदार्थांची. पण पदार्थाची. पण आई मात्र तुमच्या मनासारखे काही करू देत नाही. खरे आहे ना? मग आपण एक गंमत करू या. तुम्हीच स्वयंपाक घरात शिरून फारशी धडपड न करता काही पदार्थ स्वत:चे स्वत: बनवू शकालात तर? काय म्हटलात, जमणार नाही? छे छे अगदी सोपे पदार्थ तुम्हाला बनविता येतील त्यासाठी ते कसे बनवायचे याची साधी सोपी रीत पुढे दिलेली आहे.

यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची गॅस, मिक्सर काही वापरायचे नाही.सुरी, हात न कापता वापरता येत असेल तर ती वापरायची. थोडीशी पूर्वतयारी आई, ताई किंवा स्वयंपाकाच्या काकूंकडून करून घ्यायची. आणि बाकीचे आपण आपले करून घ्यायचे. मित्र मैत्रिणींना खाऊ घालायचे किंवा कधी मधी आई-बाबा दमले असले तर त्यांनाही हे पदार्थ तयार करून देऊन आश्चर्यचकित करायचे. ठरलं तर? चला मग. आपण स्वयंपाक घराकडे आपला मोर्चा वळवू या काहीतरी नवीन करण्यासाठी - आणि आवडीचे पदार्थ खाण्यासाठी !


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा