सेवासुविधा

जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.

शंकांचे निरसन

रसिकांना निवेदन

प्रिय रसिक,
तुमच्यासारख्याच इतर अनेक रसिक वाचकांकडून आम्हाला अनेक प्रश्न विचारणाऱ्या मेल्स येतात. सर्वसाधारणत: हे प्रश्न मराठीवर्ल्डला साहित्य पाठविणे, इंटरनेटचा वापर, अशा संदर्भातील असतात. मराठीवर्ल्डच्या सर्व वाचकांसाठी, त्यांच्या शंकांचे निरसन करणारे हे निवेदन जाहीर करीत आहोत.

१) मी माझ्या कविता लेख, चारोळया कशा रितीने तुम्हाला पाठवू?
शक्यतोवर संगणकाचा वापर करून सॉफ्ट कॉपीमध्ये मजकूर पाठवावा. त्यातही DVTT-Surekh फॉन्टस् वापरलेत तर जास्त सोईचे होईल. फॉन्टस् TTF फाईल तसेच, आपला लेख वा कविता तुम्ही पुढील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकता- mweditor@marathiworld.com किंवा आपण आपले साहित्य स्कॅन करून ते jpg, gif या स्वरूपात पाठवू शकता. पण कृपया हे झीप करून पाठवावे व झीप फाईलची साईज ५०० kb पेक्षा जास्त नसावी. पोस्टाने साहित्य पाठविण्याचा पत्ता पुढे दिला आहे-

सायबरटेक नेटवर्कस् प्रा. लि.,
२०५, अमर आर्केड, कुलकर्णी कॉलनी,
शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२
महाराष्ट्र, भारत
दूरभाष- ९१-०२५३-२३१२२८८

२) मराठीवर्ल्डवर प्रसिध्द झलेल्या मजकूराचे प्रिंटआऊट कसे घ्यावे?

जेव्हा तुम्ही साईट पाहता, तेव्हा, त्या वेबपानामध्ये सर्वात वरती डोक्यावर फाईल, एडिट, व्ह्यू, फेव्हरिट्स्, टुल्स व हेल्प इ. मेनू बार असतात. त्यापैकी फाईल या मेनूवर क्लिक केल्यावर सातवा पर्याय प्रिंट असा असतो. त्यावर क्लिक करा. हो, पण त्यासाठी तुमच्या संगणकाला जोडून प्रिंटर असायला हवा. नाहीतर, आपण ती फाईल फ्लॉपीवर कॉपी करू शकता व नंतर ज्या संगणकाला प्रिंटर जोडलेला आहे, त्या ठिकाणी हव्या असलेल्या मजकूराचे प्रिंट काढू शकता. तसेच, मराठीवर्ल्डच्या ज्या विभागामध्ये आपण आहात, किंवा ज्या माहितीचे आपल्याला प्रिंट काढावयाचे आहे, त्या ठिकाणी माऊस न्या. उजवे बटण क्लिक करा.(राईट क्लिक), त्यानंतर एक कार्यसूची आपल्यापुढे प्रकट होईल. त्यापैकी काही पर्याय ठळक व काही पुसट दिसतील. त्यापैकी तेरावा पर्याय प्रिंट हा असेल. तर प्रिंट हा पर्याय निवडूनही आपण हव्या असलेल्या माहितीची छपाई करू शकता.

३) मराठी फॉन्टस् पाठवा, किंवा मी मराठीमध्ये टाईप कसे करू?

भारत भाषा – विविध भारतीय भाषांतील सुषा व शिवाजी फॉन्टस
www.marathityping.com/how-to-download-and-install-shivaji-font-marathi-font

बाराह फॉन्टस्- बारा भारतीय भाषांतील फॉन्टस
http://www.baraha.com/index.htm

किरण- सोप्या की बोर्डचा मराठीसाठी उपयुक्त फॉन्ट
http://kiranfont.com/kf

४) मी मराठीवर्ल्डवर जाहिरात कशी देऊ?
आपला जर सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तर आमच्या मनोरंजन विभागामध्ये आम्ही त्यास योग्य प्रसिध्दी देऊ. मानधन व इतर आर्थिक बाबींसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा. जाहिरातीचा मजकूर आपल्याला तयार करावा लागेल. आपण मराठीवर्ल्डवरील विभागही प्रायोजित करू शकता. प्रतिनिधींची माहिती खाली दिलेली आहे.

५) मी मराठीवर्ल्डवरील गाणी कशी ऐकू शकतो?
गाणी ऐकविण्याकरिता लागणारी यंत्रणा मराठीवर्ल्डवर उपलब्ध नाही. प्रकाशनाचे हक्क, तांत्रिक अडचणी आणि संसाधनांची कमतरता असल्यामुळे, आम्ही आपल्याला ही गाणी ऐकवू शकत नाही.

६) मी मराठीवर्ल्डवरील गाणी डाऊनलोड करू शकतो का?
मराठीवर्ल्डवर प्रसिध्द केलेली गाणी ही मराठीचा वसा आहेत. प्रत्येकाच्या मनातील अत्तराच्या ठेव्यासारखी मूल्यवान ती आहेत. ही सर्व गाणी जी.आय्.एफ्. फॉर्मेटमध्ये प्रस्तुत केली आहेत. आपण गाण्याची चित्रात्म फाईल उघडा. त्यात गाण्याचे शीर्षक व गाणे आहे. डाव्या बाजूला मराठीवर्ल्डचे बोधचिन्ह आहे. या बोधचिन्हावर माऊसच्या साहाय्याने क्लिक केल्यावर, गाणे ‘सेव्ह’ करणे, ‘प्रिंट करणे’, ‘ई-मेल’ने पाठवणे, आणि ‘माय पिक्चर्स’ फोल्डरमध्ये साठवू शकणे हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील कोणताही वापरून आपण ती गाणी सेव्ह करू शकता, किंवा प्रिंटही करू शकता.

७) ई-दिनदर्शिका कशी डाऊनलोड करू?
प्रिय रसिक, मराठीवर्ल्डवरती डाव्या बाजूच्या वाहिन्यांमध्ये ‘सेवा सुविधा’ विभागामध्ये ‘ संपूर्ण वर्षाची ई-दिनदर्शिका’ असा पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. आतल्या पानावर सादर केलेल्या फॉर्ममध्ये आपली सर्व माहिती भरावी. कुठलाही रकाना रिकामा ठेवू नका. त्यानंतर, डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. पुन्हा एक वेब-पान येईल. जर आपल्याला स्वागतमूल्य द्यायचे असल्यास, ‘डोनेट’ हा पर्याय निवडा, द्यायचे नसल्यास, डाऊनलोड हा पर्याय निवडा. मग आपल्या संगणकातील ज्या ड्राईव्हवर तुम्हाला दिनदर्शिका सेव्ह करायची आहे, तो पर्याय निवडा. एवढे झाल्यावर दिनदर्शिका डाऊनलोड होईल. तसेच, ती ‘झीप’ फाईल असेल. आपल्याला ती प्रत्यक्ष वापरण्याआधी ‘अन् झीप’ करावी लागेल. एवढे झाल्यावर आपण या ई-दिनदर्शिकेचा वर्षभर उपयोग करू शकता.

८) मराठीवर्ल्ड ही माझी आवडती वेबसाईट आहे. मला मराठीवर्ल्डसाठी काहीतरी कासवेसे वाटते. मी मराठीवर्ल्डला योगदान कसे देऊ?
कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असू शकता, परंतु मराठीच्या प्रेमासाठी,
अ) आपण आपले ज्ञान मराठीमध्ये उपलब्ध करा. त्यास योग्य प्रसिध्दी आपण मराठीवर्ल्डमार्फत देऊ. ज्ञान संपादन करताना आपल्याला ज्या अडचणी आल्या, नव्या होतकरू, इतर लोकांना येऊ नयेत, यासाठी हे एक प्रगतीचं पाऊल ठरावं, ही यामागे संपादन मंडळाची भूमिका आहे.
आ) आपल्याकडे एखादे चांगले पुस्तक आले असेल, तर ते आमच्याकडे पाठवा. आम्ही त्याच्या प्रसिध्दीकरिता प्रयत्न करू.
इ) सामाजिक-सांस्कृतिक चळवळ वाढविणे, नवनवे आशय, विषय यांचे प्रवाही मराठी भाषेमध्ये येऊन मिळण्यासाठी आपण इंग्रजीचे शिक्षण अवश्य घ्यावे. त्याकरिता एक व्यासपीठ मराठीवर्ल्डवर उपलब्ध करता येईल.
ई) आपल्यातील कुणी संशोधक असाल, तर जरूर आपले शोधनिबंध पाठवा. इतर होतकरू वाचकांना आपल्या संशोधनाबद्दल माहिती देता येईल, व मराठीवर्ल्ड परिवारातील अभ्यासकही त्याचा लाभ उठवू शकतील.
उ) ई-मेल व भाषांतर विषयावर पुस्तक प्रकाशित करणे- या प्रकल्पांमध्ये रूची असल्यास त्वरीत आमच्याशी संपर्क साधावा. ५० रूपये स्वागतमूल्य देऊन, रसिक वाचक आपल्या शंकांचे निरसन करून, ई-मेल वापर तसेच भाषांतरातील आपली कौशल्ये वाढीस लावतील. एकमेकांना साहाय्य करून, एक अभिनव प्रकल्प यामुळे मराठीवर्ल्डला सुरू करता येईल.
ऊ) आपण आपल्याजवळील पुस्तेक, सी.डी., टेप रेकॉर्डर किंवा इतरही संशोधनास उपयुक्त साहित्य मराठीवर्ल्डच्या सुपूर्द करू शकता. आपल्या भरीव योगदानासाठी आम्ही आपल्याला श्रेय तर जरूर देऊच, तसेच आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला निमंत्रित करू, तुम्ही मराठीवर्ल्ड परिवाराचे सदस्य गणले जाल, याची खात्री बाळगा…
ए) आपण धनादेशाद्वारे मराठीवर्ल्डला देणगी देऊ शकता. या देणगीचा योग्य व साहित्यिक कारणांसाठीच वापर केला जाईल, याची हमी आम्ही तुम्हाला देतो.

आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा- mweditor@marathiworld.com