पोळी-भाकरी मुख्यपान

गोल पराठा


साहित्य - मैदा, कणिक, तूप, मीठ

कृती - चवीपुरते मीठ टाकून नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घ्या. फुलक्याच्या आकाराची पोळी लाटून तूप व मैदा भुरभुरवून मोदकाप्रमाणे बाजूने कळ्या पाडत आकार द्या व वरचे टोक आले की तसेच दाबून टाका व पुन्हा जाडसर पराठा लाटा. नेहमीप्रमाणे तूप टाकून  लाटा.


जिलेबी पराठा


साहित्य  - कणिक, पाणी, मीठ

कृती - चवीला मीठ घालून नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घ्या. गोल लहान पोळी लाटून ती मध्यापासून दुमडून गोल कोन तयार करा. हा कोन अलगद दाबा. जिलेबीप्रमाणे गोळा तयार होईल. तो लाटा व तूप सोडून खमंग भाजा. 

लच्छेदार पराठा


साहित्य - मैदा, तूप, कणिक, मीठ 

कृती - चवीला मीठ घालून नेहमीप्रमाणे कणिक हवी तेवढी भिजवा. प्रथम एक गोळा घेऊन लांबट लाटा. त्याच आकारात थोडा ओढून घ्या. तूप व मैदा भुरभुरवा. लांबीच्या आकारात घडी घाला व एका बाजूने गुंडाळत न्या. उभ्या आकारात हाताने दाबा व जाडसर लाटा. चक्रासारखे पदर येतील. तव्यावर तूप सोडून खुसखुशीत भाजा.


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF