धाराकुंड

dharakundaअजंठा, वेरूळ,पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेल्या मराठवाड्याचा परिसर हा खरतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरासाठी प्रसिदध आहे.त्याचबरोबर इथे काही शांत निसर्गरम्य ठिकाणेसुद्धा पाहायला मिळतात.धाराकुंड हे त्यातलेच एक. चाळीसगाववरून बनोटीपयत चांगला रस्ता आहे. बनोटीला असलेले एक प्रचिन महादेवाचे मंदिर पाहण्याजोगे आहे.बनोटीपासून पुढे काहीसा कच्चा रस्ता असून काही अंतर मात्र चालत जावे लागते.एक दोन तास चालले की समोर एक मोठा धबधबा दिसू लागतो.वाटेत आधी एक तलाव लागतो त्याच्या काठाकाठाने डोंगराच्या अगदी पोटात जावे लागते.अंदाजे २०० फुटावरून आता आपल्यासमोर धबधबा कोसळत असतो.खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप उंचीवरून पडणारे पाणी खाली तयार झालेल्या एका मोठ्या डोहात जमा होते.

आजूबाजूलासर्वत्र या पाण्याचे तुषार उडत असतात.जर जोराचा वर आला तर हे खाली पडणारे पाणी अधूनमधून वरच्या दिशेलाही उडते.आजूबाजूचा सारा परिसर हिरवागार झालेला असतो आणि त्यात मधोमध हा अव्याहत कोसळणारा जलप्रपात सारे वातावरण गूढरम्य करून टाकतो.या ठिकाणी डोंगराच्या पोटात एक मोठी घळ तयार झालेली आहे.त्या घळीत महादेवाची एक पिंड आहे.त्याच्यावर समोरच नंदीची प्रतिमा दिसते.त्या घळीची लांबी अंदाजे ३०० फूट असून,खोली जवळजवळ ३० ते ४० फूट इतकी भरते.घळीला काही नैसगिक भिंती असून,त्यामुळे विविध कप्पे तयार झालेले आहेत. बाहेर खूप उंचावरून मोठा आवाज करत कोसळणारा धबधबा आणि त्यासमोर तयार झालेले मोठे कुंड हे या घळीतून पाहण्याची मजा वेगळीच आहे.

या ठिकाणी येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कन्नड या तालुक्याच्या गावावरून घाटशेद्रा या गावी जायचे.घाटशेद्रावरून तळनेर या गावी आपले वाहन ठेवायचे आणि डोंगराच्या काठापर्यंत चालत जायचे. इथे एक महादेवाचे देऊळ दृष्टीस पडते.जुन्या पडलेल्यादेऊळाचे अवशेष या ठिकाणी वापरलेले दिसतात.इथून डोंगर उतरून आपण धाराकुंडला जाऊ शकतो,परंतु तळनेर गावातून कोणी वाटाड्या घेऊन जावा. डोंगरावरून खाली काहीसे जपून उतरावे लागते,पण इथे आपण धाराकुंडला वरून खाली जात असल्यामुळे एक वेगळाच निसर्ग अनुभवता येतो.धारकुंडचा धबधबा खरोखर प्रेक्षणीय आहे. निसर्गसान्नीध्यात वसलेले हे ठिकाण मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.तळनेर गावातून कोणी वाटाड्या घेऊन जावा. डोंगरावरून खाली काहीसे जपून उतरावे लागते,पण इथे आपण धाराकुंडला वरून खाली जात असल्यामुळे एक वेगळाच निसर्ग अनुभवता येतो.धारकुंडचा धबधबा खरोखर प्रेक्षणीय आहे. निसर्गसान्नीध्यात वसलेले हे ठिकाण जाऊन पाहण्याजोगे आहे.

– अमोल मारुती निरगुडे

जोतिबा

jotiba सुप्रसिध्द १२ जोर्तिलिंगांपैकी हे एक मंदिर आहे. याला ‘केदारनाथ’ आणि ‘वाडी रत्नागिरी’ ही देखील दोन नावे आहेत. माता महालक्ष्मीच्या दानवांबरोबर झालेल्या युध्दामधे जोतिबाने तिला मदत केली आशी आख्यायिका पुरांणांमधे सापडते. हया डोंगरावरती त्याने आपले राज्य स्थापन केले. नाथ पंथीयांचे हे विख्यात दैवत आहे. जोतिबाचा जन्म चैत्र शुक्ल षष्ठीस, पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा हयांच्या पोटी झाला.

कोल्हापूरच्या उत्तरेस, उंचच उंच सुळके आणि हिरव्यागार पर्वतराजींच्या सान्निध्यात, जोतिबाचे देऊळ वसले आहे. इ. सन १७३० मधे, नवाजिसायाने मूळ मंदिर बांधले. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३३० फूट आहे. आतील मूर्ती चतुर्भुज असून सजावट प्राचीन आहे. त्या परिसरामधे इतर काही मंदिरे व दीपमाळा आहेत. चैत्री पौर्णिमेस इथे भरणाऱ्या जत्रेला अनेक भाविक गर्दी करतात. या यात्रेकरूंच्या हातात, उंच काठया (शासन) असतात. उधळलेल्या गुलालाच्या रंगाने जोतिबाचा अवघा डोंगर गुलाबी झाला आहे. याचा शुभवार रविवार आहे. हया देवस्थानामधे भाविकांकडून तसेच सरकारी पातळीवरूनदेखील बरीच सुधारणा झाली आहे. इथेच एक नवी योजना हाती घेऊन, ‘प्लाझा गार्डन’ विकसित केली आहे.